पुणे : पुणे पोलिसांनी काही दिवसांपासून धडक कारवाया करत देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आणले आहे. पुणे पोलिसांनी आतापर्यंत ४ हजार कोटी रुपयांचे ड्रग्जचे साठे जप्त केले आहेत. या ड्रग्जचे कनेक्शन सांगली, दिल्ली आणि आता गोव्यातही असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे पोलिसांनी सांगलीमधील कुपवाड परिसरातून जप्त केले आहे. कुपवाड येथून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हे गोव्यात देखील पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यासोबतच पुण्यातील ड्रग्ज दिल्ली व्हाया पंजाब आणि हरियाणात गेले असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत पुणे गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत कुपवाडमध्ये मिठाच्या पोत्यात लपवून ठेवलेले ३०० कोटींचे १४० किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी आयुब मकानदारसह दोघांना ताब्यात देखील घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केल्यानंतर हे ड्रग्ज गोव्याला पुरवले जात होते अशी माहिती समोर आली आहे.
पुणे पोलीस आणि सांगली पोलिसांच्या मदतीने कुपवाडमधील स्वामी मळा येथे एका गोडाऊनवर छापा टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी मीठाच्या पोत्यात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले होते. यातील काही माल हा गोव्यात विक्रीसाठी पाठवण्यात आल्याचं समोर आले आहे.
‘पुण्यातील ड्रग्स कनेक्शन अंडरवर्ल्ड किंवा दुबईपर्यंत पोहचू शकते. याप्रकरणात आत्तापर्यंत पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यामधून ७१७ किलो आणि दिल्लीच्या साऊथ एक्स्टेन्शन भागातून दोन ठिकाणांवरील तीन गाळयांमधून ९७० किलो ‘एमडी’ जप्त केले आहे. तर, सांगलीमधून १४० किलोच्या घरात ‘एमडी’ जप्त करण्यात आले आहे’, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-नवा पक्ष, नवे चिन्ह, शरद पवार रायगडावर तुतारी वाजवत लोकसभेचे रणशिंग फुंकणार
-“हा नणंद भावजईचा कौटुंबिक कार्यक्रम नाही’; सुप्रिया सुळेंनी घेतली निवडणूक सिरिअसली
-पवार कुटुंबातील कोणीच अजित पवारांचा प्रचार करणार नाही?; जय पवारांची प्रतिक्रिया
-“बैलगाडा शर्यतीचं काम मी केलं अन् क्रेडीट मात्र…, तिकिटासाठी मी पक्ष बदलत फिरत नाही”
-म्हाडाचे अध्यक्षपद पण लोकसभा उमेदवारीतून आढळरावांचा पत्ता कट???; म्हणाले….