पुणे : पुणे महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले रहावे तसेच त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी पालिका प्रशानाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. पालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ‘मेंटल हेल्थ अॅप’ खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या या ॲपचे २ हजार युनिट खरेदी केले जाणार आहे. यासाठी कंपन्यांनी दिलेल्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) सव्वाकोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
स्थायी समितीच्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला जाणार असून, त्याला मान्यता मिळाल्यानंतर या अॅपची खरेदी केली जाणार आहे. सध्या या ॲपचे २ हजार युनिट खरेदी केले जाणार असून एका युनिटसाठी ६ हजार ३७२ रुपये खर्च येणार आहे. ‘मेंटल हेल्थ ॲप’च्या २ हजार युनिटसाठी १ कोटी २७ लाख ४४ हजार रुपये खर्च येणार आहे. हे युनिट दोन वर्षांसाठी घेण्यात येणार आहेत. हा खर्च सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहे, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये तब्बल १७ ते १८ हजार कर्मचारी काम करतात. कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मानसिक आणि शारीरिक तणावाला सामोरे जावे लागते. यावर उपाय म्हणून पालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आरोग्य तपासणी, आरोग्य विषयक मार्गदर्शन, योग असे विवध उपक्रम राबले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हफ्ता मिळाला पण…; भुजबळांच्या वक्तव्याचा योजनेवर परिणाम?
-‘महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा सुपडा साप करणार’; शंकर जगताप यांचा विश्वास
-पुण्याच्या बहाद्दराची कमाल, लग्नाच्या अमिषाने २५ महिलांना लावला चुना; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
-राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या निकटवर्तीयाचं मोठं वक्तव्य