पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत आली असून पर्वती विधानसभा मतदारसंघात देखील अपक्ष उमेदवार, पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या प्रचारार्थ कोपरा सभा, मतदारांच्या गाठीभेटी सुरु आहेत. या माध्यमातून आबा बागुल यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी मांडल्या जाणाऱ्या आश्वासक व्हिजनला मतदारांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
‘पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे. विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षिततेसह आर्थिक स्वावलंबन, सुविधांनाही अग्रक्रमाने प्राधान्य असणार आहे. पहिल्या वर्षांपासून ती अंमलात येणार आहे.त्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. त्यासाठी हिरा निशाणी समोरील बटन दाबून ‘पर्वती’च्या रखडलेल्या विकासाला गती द्यायची आहे’ असे आवाहन अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी केले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी इंजिनिअर, वास्तु विशारद, पर्यावरणतज्ज्ञ, डॉक्टर्स, वकील, शिक्षणतज्ञ, टाउनप्लँनेर, नगरनियोजक, समाजसेवक, उद्योजक आदींसह विविध तज्ज्ञांचा समावेश आहे. या व्हिजनबाबत माहिती देताना, ‘पर्वती मतदारसंघाच्या सुनियोजित विकासाला चालना देण्यासाठी ‘पर्वती फर्स्ट’च्या माध्यमातून एक रोडमॅप तयार आहे. त्यानुसार पुणे महापालिका व राज्यसरकारच्या जागा उपलब्ध करून घेतल्या जाईल. या जागांवर लोकोपयोगी प्रकल्पांची उभारणी होणार आहे. त्यासाठी निधी उभारणीबाबतही नियोजन झालेले आहे. शाळा, रुग्णालये, युथ सेंटर आदी विविध प्रकल्पातून नागरिकांना दिलासा मिळणार आहे’, असे आबा बागुल म्हणाले आहेत.
“आज मुबलक पिण्याचे पाणी पुरवता येत नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे मतदारसंघात सर्वत्र समान आणि मुबलक पाणीपुरवठ्यासाठी ‘ऑनलाईन वॉटर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम’ सारखी योजना निश्चितच दिलासादायक ठरणार आहे. वाहतूक कोंडी, वाढत्या प्रदूषणामुळे आज नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. त्यातून मुक्तता करण्यासाठीही ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘एआय ‘तंत्रज्ञानावरील सीसीटीव्ही सर्व्हेलन्स यंत्रणा बसवली जाणार आहे. कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहराच्या प्रवेशद्वारातून समजतो.”
“आपल्या ‘पर्वती’ला ४ प्रवेशद्वार आहेत.ते आकर्षक व विविध रंगात साकारणार आहोत. त्यामुळे पर्वती मतदारसंघाची प्रतिमा निश्चित उंचविणार आहे. आपले आणि भावी पिढीचे जीवनमान उंचावण्यासाठी आता हीच वेळ आहे, बदल घडवायची. त्यामुळे कुणावरही विसंबून न राहता,एकत्र येऊ आणि आपले प्रश्न आपणच सोडवू यासाठी हिरा निशाणी समोरील बटन दाबून पर्वती मतदार संघाच्या सर्वसमावेशक विकासाला चालना द्यायलाच हवी”, असेही आबा बागुल म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
-इंदापूरात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला; भरणे जागा राखणार की, हर्षवर्धन पाटील गड हिसकावणार?
-बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीची प्रतिष्ठेची लढाई; पिंपरी विधानसभेवर कोण आपला झेंडा रोवणार?
-वडगाव शेरीत महायुतीला मोठा धक्का; माजी नगरसेविका टिंगरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
-“दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठाचा निर्णय घेता आल्याचा आनंद”- चंद्रकांत पाटील
-शरद पवारांची मानसपुत्र वळसे पाटलांच्या मतदारसंघात जंगी सभा; आंबेगावमधून तुफान फटकेबाजी