पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांवर कारवाई केली आहे. बंडखोरी करत विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसने आतापर्यंत एकूण २८ काँग्रेस बंडखोरांची हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशावरुन महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून पक्षाने बंडखोरांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे. निलंबनाच्या कारवाईवरुन माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काही वरिष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहे.
‘काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काही वरिष्ठ नेते पक्ष संपवायला निघालेले आहेत’ असा आरोप बंडखोर उमेदवार आबा बागुल यांनी केला आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिला होता. आपण अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी साधा फोनही केला नाही. निलंबनाची कारवाई करताना पक्षाच्या घटनेनुसार आपली बाजू ऐकून घेण आवश्यक असतं, असं असताना आपल्या विरोधात षडयंत्र रचून निष्ठावंत कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रकार पक्षामध्ये सुरू आहे”, असा गंभीर आरोप आबा बागुल यांनी केला आहे.
प्रचारादरम्यान फूड पॉइजनिंग झाल्यामुळे बागुल यांना सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, अशा अवस्थेत देखील बागुल यांनी पत्रकार परिषद घेऊन निलंबनाच्या कारवाईबाबत भूमिका मांडली आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र मुळक, काटोलमधून काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ञवल्क्य जिचकार, पर्वती विधानसभा मतदारसंघातून आबा बागुल आणि कसबा विधानसभा मतदारसंघातून कमल व्यवहारे यांना ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
-‘लोकसभेला साहेबांच्या वयाचा विचार करुन आमचा करेक्ट कार्यक्रम केला’; अजितदादांची खदखद
-स्वर्गीय गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा, कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा!
-‘चंद्रकांत दादांमुळे मुलींना मोफत शिक्षण’; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांकडून कौतुक
-पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कूल उभारणार- आबा बागुल
-सुरक्षित पुण्यासाठी महायुतीचं मोठं पाऊल; नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ६० कोटींचा निधी