पुणे : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. एकीकडे राज्यभर काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष सुरु होता तर दुसरीकडे पुण्यात मात्र काँग्रेसला पराभवाला सामोरं जावं लागलं. यामुळे पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शहरात संघटनात्मक बदल करण्याची मागणी स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्याचे काँग्रेस पुणे शहराध्यक्ष असलेले अरविंद शिंदे यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी अशी मागणी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी महाराष्ट्रातील वरिष्ठांकडे केली होती.
‘येऊ घातलेल्या विधानसभा, महापालिका निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाला पुण्यात सक्षम करण्यासाठी तातडीने शहर नेतृत्त्वात बदल करावा’, अशी मागणी काँग्रेसमधील शिष्टमंडळाने पक्षाचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे काही दिवसांपूर्वी केली होती. या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर प्रदेश पातळीवर पुणे शहराध्यक्ष बदलाबाबत कोणताही घेण्यात आला नाही. त्यानंतर आता काँग्रेसच्या या शिष्टमंडळ थेट केंद्रात पोहचलं.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. ‘लोकसभा निवडणुकीत पक्षाची हानी होईल, असे वर्तन शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले आहे. त्याचा फटका पक्षाला बसला आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय नेते पुण्यात आले तरी, त्यांची भेटही शिंदे यांनी घेतली नव्हती. बूथ कमिट्यांमध्ये बोगस नोंदणी झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला कसबा, कँटोन्मेंट, शिवाजीनगर या मतदारसंघात विजय मिळवायचा असेल तर, आत्तापासूनच तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी पक्ष संघटना भक्कम करण्यासाठी शहर नेतृत्त्वात बदल करण्याची गरज असल्याची म्हणत शहराध्यक्ष बदलाची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?
-विधानसभेच्या तोंडावर इंदापूरात अजित पवारांना धक्का; ‘या’ युवा नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’
-‘इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढवणारच’; लेकीचा निर्धार, दत्तात्रय भरणेंची डोकेदुखी वाढली
-वेशांतर करुन अजित पवार दिल्लीला? दादा भडकले, ‘असं म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम..’
-पुणेकरांनो सावधान! झिका व्हायरसने घेतला चौथा बळी; ‘या’ भागात जास्त धोका?