पुणे : सध्या राजकीय वर्तुळात राजकारणात कसब्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे चांगलेच चर्चेत आहेत. रवींद्र धंगेकर हे पोटनिवडणूकीत विजयी झाले आणि सर्वत्र धंगेकर पॅटर्नची चांगली चर्चा रंगली. धंगेकरांची सोशल मीडियावर तगडी चर्चा झाली. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि विधानसभा निवडणुकीत ज्या भाजपच्या हेमंत रासनेंचा रवींद्र धंगेकरांनी पोटनिवडणुकीला पराभव केला त्याच रासनेंनी विधानसभेला धंगेकरांना पराभवाची धूळ चारली. त्यानंतर धंगेकर पॅटर्न पूर्णपणे थंडावला. पराभव न पचवणाऱ्या नाराज धंगेकरांनी गेल्या काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे धंगेकर हे शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले.
पुणे काँग्रेसने देखील येऊ घातलेल्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे काँग्रेसने कसबा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार धंगेकरांकडे न सोपवता अभय छाजेड यांच्यावर सोपवली आहे. त्यानंतर धंगेकरांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला आता जोर आला आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहरातील नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे.
”आमदार रवी भाऊ आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पण विचार करू शकता की. रवी भाऊ आपण हाडाचे कार्यकर्ते, सक्षम लोकप्रतिनिधी. निवडणुकीत हार जीत चालतच असते. नेतृत्व,कामाची पद्धत थांबत नसते. भाऊ तुझ्या सोबत काम केले आहेच. काही दिवस बातमी येत आहे दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार आहे. कार्यकर्त्यांची मीटिंग घेणार आहात, कुठे प्रवेश करायचा या संदर्भात चर्चा विनिमय करणार आहात. रवी भाऊ अजितदादांचे आणि तुझे संबंध नेहमीच चांगले आहे ते तू अनुभवले आहेत”, असे म्हणत रुपाली ठोंबरे पाटील यांनी धंगेकरांना थेट ऑफर दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राजाराम पुलावरील उड्डाणपूलाला ‘नरवीर तानाजी मालुसरे’ नाव देण्याची मागणी
-माणुसकी सोडली, बापाचे ऋण विसरल्या; मुलींकडून मान खाली घालायला लावणारं कृत्य
-भल्या सकाळी उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला; शिंदेंच्या खास मिशनवरुन राज संतापले
-गजा मारणे टोळीकडून भाजप कार्यकर्त्याला बेदम मारहाण; मोहोळांनी पुण्यात पोहचताच घेतली भेट
-रवींद्र धंगेकरांच्या ‘त्या’ व्हाट्सअप स्टेटसमुळे पुण्यात राजकीय भूकंप! नेमकं काय प्रकरण?