पुणे : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरुन धंगेकर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले अन् राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली. महाविकास आघाडीला मिळालेल्या पराभवानंतर ठाकरेसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते, आमदार, पदाधिकाऱ्यांनी महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केला. त्यातच धंगेकरांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली.
काही दिवसापूर्वी पुण्यातील ठाकरे गटाच्या ५ माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केला होता. त्यावेळी महायुतीमधील नेत्यांनी सांगितले होते की, लवकरच पुण्यातील अनेक माजी आमदार महायुतीमध्ये सहभागी होतील, असे वक्तव्य केले आहे. धंगेकर यांचा लोकसभा निवडणुकीत मुरलीधर मोहोळ आणि लोकसभा निवडणुकीत हेमंत रासने यांनी परभव केला. धंगेकरांच्या उमेदवारीवरुन वारंवार काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह झाल्याचं पहायला मिळालं होतं. तसेच धंगेकर हे पक्षाच्या कार्यक्रमांना तसेच बैठकांना अनेकदा गैरहजर असायचे. यावरुन धंगेकरांच्या मनात नेमकं काय सुरु आहे? अशा चर्चा असतानाच त्यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने धंगेकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. या चर्चेवर आता माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मी काल मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट वैयक्तिक कामासाठी होती.या भेटीमधून कोणताही राजकीय अर्थ काढू नये, मी काँग्रेस पक्षात आहे. मी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, माझा थोडा प्रॉब्लेम होता, त्यानिमित्त मी त्यांना भेटलो. मला वाटलं तर मी अजितदादांना देखील भेटू शकतो. माझे त्यांच्याशी पूर्वीचे संबंध आहेत. मात्र, मी काँग्रेसमध्येच राहणार आहे, शिवसेनेत प्रवेश करणार नाही”, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात १५ हजार महिलांच्या उपस्थितीत “सन्मान स्त्री शक्तीचा” गौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
-Pune GBS: केंद्राने महाराष्ट्राच्या मदतीसाठी टीम पाठवली पण…; नागरिक संतप्त, वाचा नेमकं काय झालं?
-आश्चर्यकारक! गर्भवती महिलेच्या पोटात बाळ अन् बाळाच्या पोटात बाळ; नेमका काय प्रकार? वाचा…
-Pune GBS: 30 हजार घरांचे सर्व्हेक्षण अन् पालिकेने जाहीर केले जीबीएस बाधित क्षेत्र
-पुण्यात व्हिला तर मुंबईत फाईव्हस्टार फ्लॅट, पुण्याच्या माजी पोलीस आयुक्तांची ACB कडून चौकशी