पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असली तरीही विधान परिषदेसाठी पक्षातील नेत्यांनाच विरोध होताना दिसत आहेत. असे असतानाच आता आपल्या समाजाचा आमदार व्हावा, अशा मागण्या जोर धरु लागल्या आहेत. याचा अनुभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी धनगर समाजाचे नेते विश्वास देवकाते यांना विधान परिषदेवरती संधी द्यावी, या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.
अजित पवारांनी बारामतीमधील राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबार घेण्यासाठी एन्ट्री केली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘आमच्या समाजाच्या नेत्याला आमदारकी मिळावी’ यासाठी धनगर समाजाने आज बारामतीमध्ये अजित पवारांसमोर जोरदार घोषणाबाजी केल्याचे पहायला मिळाले.
गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतो आहे. यामध्येच पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले विश्वास देवकाते अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. तसेच धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना आमदारकी मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
दरम्यान, पुण्यातही विधान परिषदेच्या आमदारकीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद पहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा असतानाच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या-
-भाजप आमदार महेश लांडगेंना जीवे मारण्याची धमकी; नेमका काय प्रकार?