पुणे : पुणे हिट अँड रन प्रकरणी अनेकांवर आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. या प्रकरणामध्ये आरोपीच्या पिंजऱ्यात अनेकांना उभं करण्यात आले आहे. काहींची चौकशी सुरु आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवलं असून त्याचे वडिल, आजोबांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यातच आता पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर त्यांचेच सहकारी असणाऱ्या खेड-राजगुरुनगरच्या प्रांताधिकाऱ्यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
‘राजकीय प्रभावातून दिवसे काम करत असून, लोकसभा निवडणुकीची मतमोजणी ही पारदर्शकपणे पार पडणार नाही. अशी तक्रार करत प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारेंनी दिवसेंची ४ जून पूर्वी बदली करावी’ अशी मागणी थेट निवडणूक आयोगाकडे केली आहे. सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहितेंचा दबाव असल्याचे देखील तक्रारीत नमूद केले आहे.
पुण्याचे कृषी आयुक्त, क्रीडा आयुक्त, पुणे पीएमएमआरडीएचे संचालक आणि पुणे जिल्हाधिकारी म्हणून सुहास दिवसे यांनी वर्षानुवर्षे कार्यरत राहिले आहेत. सुहास दिवसे हे पुणे आणि परिसरात वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत. या अपघात प्रकरणावरुन राजकीय वरदहस्त कारणीभूत असल्याची चर्चा नेहमीच होत होती.
‘सुहास दिवसे हे अनेक वर्षे कृषी आयुक्त, क्रिडा आयुक्त, पी.एम.आर.डी.ए. चे संचालक अशा विविध पदांवर काम करत पुण्यातच ठाण मांडून आहेत. त्यासाठी दिवसेंनी त्यांच्या राजकीय हितसंबंचा आधार घेतला आहे, असा गंभीर आरोपही जोगेंद्र कट्यारे यांनी सुहास दिवसेंवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-रवींद्र धंगेकरांनी पुण्याला दिली उडता पंजाबची उपमा; म्हणाले, “उमलती फुले कोमजण्याचे काम…”
-पुण्यात धक्कादायक प्रकार; जमिनीच्या वादातून २२ वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न
-एमपीएससीच्या PSI परिक्षेचा निकाल जाहीर; पुण्यातील अजय, मयुरीने मारली बाजी