पुणे : प्रत्येकदण दिवसाची सुरवात करताना चहानेच करत असतात. चहा म्हणजे कित्येकांचं सुख, चहा म्हणजे प्रेम. ‘चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवा’ हे समीकरण आता सर्वत्र पहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व स्तरातील मंडळी चहा पिण्याला प्राधान्य देतात. पहावं तिकडे चहाप्रेमी दिसतातच. त्यामुळे चहाच्या व्यावसायाला विशेष प्राधान्य दिलं जात आहे.
पुण्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी चहाच्या व्यावसायाला चांगलाच हातभार लावला आहे. हे विद्यार्थी दिवसाला किमान दोन वेळा चहा पित असून वर्षाला सुमारे २६ कोटी रुपयांचा चहा ‘रिचवत’ असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. ‘एमपीएससी स्टुडंट्स राईट’चे महेश बडे यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून पुण्यातील विविध भागातील चहा दुकानांचे सर्वेक्षण केले. राज्यभरातून लाखो विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुण्यात अभ्यासासाठी येतात.
घरापासून घरच्यांपासून लांब राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना त्यांच्या नव्याने होणाऱ्या मित्रांचा काय तो आधार असतो, पण यासोबतच अभ्यास करून आलेला कंटाळा दूर करण्यासाठी, ताण हलका करण्यासाठी तसेच एकटेपणा घालवण्यासाठी सर्वात मोठा आधार कोणता असेल तर तो म्हणजे चहाच.
सध्याचा काळ हा ब्रँडिंगचा आहे. जेवढे ब्रॅडिंग तेवढा धंदा तेजीत, असे एकूणच चित्र दिसून येते. त्यात स्पर्धा परीक्षेची विद्यार्थी संख्या लाखात आहे. ते दिवसातून कमीत कमी दोन वेळा चहा पितात. या स्पर्धेत सर्वच विद्यार्थ्यांना नोकरी मिळेल, असे नाही. वर्षानुवर्षे पुण्यात राहिल्यानंतर आता घरी जाऊन काय सांगावे, या विचाराने ही मुलं नैराश्यात जातात. त्यापैकी काही स्वत:चा व्यवसाय करुन वेगळी वाट धरतात.
अनेकांनी खासगी क्लासेस सुरू केले. विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांची गरज ओळखून हॉटेल्सचा व्यवसायदेखील सुरू केला आहे. चहाची क्रेझ पाहता अनेक विद्यार्थ्यांनी चहा व्यवसाय फ्रँचायझी विकत घेऊन दुकाने सुरू केली आहेत, तर काहींनी स्वत:चा चहाचा ब्रॅंड तयार केला आहे. त्यातून त्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’
-‘लोकांपर्यंत चिन्ह पोहचवा, विश्वास द्या यश, नक्की मिळेल’; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना
-“आम्ही कोणाचाही पक्ष चोरला नाही, संसदेत भाषणं ठोकून कामं होत नाहीत”
-मनोज जरांगेंची प्रकृती गंभीर; आक्रमक आंदोलकांकडून पुण्यात ठिकठिकाणी चक्काजाम