पुणे : पुणे शहरात झालेल्या पोर्शे कार अपघात आणि त्यानंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील एफ सी रोडवरील एल थ्री बारमधील २ तरुण ड्रग्जचे सेवन करतानाचा व्हायरल झालेला व्हिडीओ यावरुन तसेच पुणे शहरामध्ये ड्रग्जचे वाढते प्रमाण तरुणांना बिघडवण्याचे काम होत असल्यामुळे राज्यभरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
शहरातील ड्रग्जच्या प्रकरणावरून आता राज्य सरकारवर चहुबाजूंनी टीका होत आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य करत राज्यातील अनधिकृत पबवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला. “राज्यातील शहरे जोपर्यंत ‘ड्रग्ज मुक्त’ होत नाहीत, तोपर्यंत बुलडोझर कारवाई सुरु राहणार”, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
“ड्रग्ज विकणाऱ्यांवर, ड्रग्ज ठेवणाऱ्यांवर तसेच ज्या हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री केली जाते आणि या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करण्याचे काम जे लोक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. फक्त पुणे शहरच नाही तर पुणे, ठाणे, नाशिक आणि संपूर्ण राज्यात जिथे कुठे ड्रग्ज विक्री होत असेल त्यांना सोडले जाणार नाही”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणाले आहेत.
“ड्रग्जची पाळेमुळे उखडून फेकण्याचे काम पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त करत आहेत. ड्रग्जचे जे सप्लायर असतील आणि कोणी कितीही मोठे असले तरी त्याला सोडले जाणार नाही. तरुण पिढी बरबाद होऊ देणार नाही. जोपर्यंत पूर्णपणे ड्रग्ज मुक्त शहरं होत नाहीत तोपर्यंत ही बुलडोझर कारवाई चालू राहिले. जे कोणी ड्रग्ज विकत आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणात जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधान परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; भाजपच्या ‘या’ नेत्यांची विधान परिषदेवर लागणार वर्णी!
-पुणे ड्रग्ज: शहरातील अनधिकृत पब्ज आणि बारच्या कारवाईवर सौरभ गोखलेची प्रतिक्रिया
-पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, मोहोळांचा दिल्ली दरबारी पाठपुरावा यशस्वी
-संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी विठुनामात तल्लीन
-धक्कादायक! पुण्यातील नामांकित हॉस्पिटलने लपवली झिकाचा रुग्णाची माहिती; पालिकेने घेतली मोठी अॅक्शन