पुणे : जिल्हा नियोजन समितीची आज पुण्यात बैठक पार पडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, नियोजन समितीचे सदस्य यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, खासदार शरद पवार, खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. या बैठकीमध्ये खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवारांना चांगलेच घेरल्याचे पहायला मिळाले आहे.
बारामतीमध्ये दूषित पाण्यावर काय उपाय योजना केली जाणार?, असा सवाल शरद पवारांनी अजित पवारांना विचारला असत त्यांनी ‘कारखान्यांना नोटीस पाठवण्यास सांगितले आहे’, असे थोडक्यात उत्तर अजितदादांनी दिल्याचे पहायला मिळाले आहे. यावेळी अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी खासदार निधी मिळाला नसल्याची तक्रार शरद पवारांसमोरच बोलून दाखवली आहे. याकडे मात्र अजित पवारांनी दुर्लक्ष केले असल्याचे पहायला मिळाले आहे.
अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी ह्या प्रश्नांचा मुद्दा उपस्थित करत अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली आहे. ‘समितीच्या बैठकीत आमदार, खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत. त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा, प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही’, असं अजित पवार म्हणताच वातावरण तापल्याचे पहायला मिळाले.
‘जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न त्यांची बाजू मांडू शकतात. पण इतके वर्ष मी पालकमंत्री होतो. जिल्हा परिषद ताब्यात होती म्हणून मी आमदार, खासदारांना काही बोललो नाही. पण नियमानुसार आमदार, खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही’, असे अजित पवार स्पष्टपणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती
-आधी म्हणाले, ‘मित्राचा मुलगा’ आता शरद पवार त्यांनाच म्हणाले ‘फडतूस माणूस’
-आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली, वेटींग लिस्ट लागली; वाचा कधीपासून प्रवेश सुरु?
-वसंत मोरेंना ‘तो’ फोन कोणी केला? मोरेंच्या आरोपावरुन पुण्याच्या राजकारणात खळबळ