पुणे : राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र मंचरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पहायला मिळाली आहे. शिरुर लोकसभेत विजयी झालेले डॉ. अमोल कोल्हेंचा सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमामध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला म्हणून ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला आहे.
“जे माझ्या मनात आहे, ते तुम्हाला सत्यात उतरवावे लागेल. २०१९च्या निवडणुकीत मी म्हणालो होतो की, या माणसाचे नाव देवदत्त आहे की विश्वास आहे? त्यांनी दोन्ही निवडणुकांमध्ये कायम विश्वास जपला. २०२४च्या निवडणुकीमध्ये भलेभले मनात इमले बांधत होते. ते उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी ताकद लावली. तुम्हा सर्वांना सोबत घेऊन आंबेगाव तालुक्यात इतिहास घडवला. ते भावी आमदार देवदत्तजी निकम साहेब आहेत”, असे अमोल कोल्हे म्हणाले. कोल्हेंच्या याच वक्तव्यावरुन ठाकरे गटाचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले आहेत.
शिवसैनिक आक्रमक झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी सभेतून काढता पाय घेतला. सभास्थळावर शिवसेना कार्यकर्त्यांची घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर शिवसैनिक आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“बारामतीच्या विकासासाठी मोदींची मदत घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही”
-पुण्यात तुबलेल्या पाण्याने नागिकांचे हाल; सुप्रिया सुळेंनी पालिका प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा
-पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारात मिळणार ‘हे’ १५ पदार्थ
-‘ही तर तात्पुरती सूज’; महाविकास आघाडीच्या यशावर शिंदेंच्या मंत्र्याची फुंकर
-पावसाळ्यात गरम पाणी प्यायल्याने काय होते? जितके फायदे तितकेच तोटेही