पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्व पक्षांकडून उमेदवार निश्चितीसाठी भेटीगाठी, बैठका, मुलाखती होत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता चिंचवड विधानसभा निवडणूक लढण्यासाठी महाविकास आघाडीकडून इच्छूक नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. नाना काटे, राहुल कलाटे आणि चंद्रकांत नखाते या ३ नेत्यांनी आज चिंचवडमधून उमेदवारीसाठी शरद पवारांची भेट घेतली आहे. या भेटीबाबत नाना काटे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“जयंत पाटील, सुप्रिया सुळेंचा फोन आला, त्यांनी वाय,बी, सेंटर येथे बोलावलं. त्याठिकाणी आम्हाला प्रत्येकाला माहिती, पार्श्वभूमी विचारली. प्रत्येकाने आपल्या मतदारसंघाची माहिती दिली. त्यानंतर आमची शरद पवारांची चर्चा झाली, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, हा मतदारसंघा कोणत्या पक्षाला द्यायचा, पण त्यांनी म्हटलं की, तुमच्या तिघांमध्ये जर चर्चा झाली आणि त्यानंतर तुम्ही ठरवलं तर सोईचं होईल”, असे नाना काटे यांनी सांगितले आहे.
“भेटीवेळी आम्ही शरद पवारांना सांगितलं तुम्ही याबाबतचा निर्णय घ्या, आमच्या तिघांपैकी तुम्ही कोणाला उमेदवारी देणार? ते तुम्हीच ठरवा. योग्य तो निर्णय घ्या, गेली पोटनिवडणूक, मते, पार्श्वभूमी याबाबतच्या चर्चा करून तुम्ही निर्णय घ्या”, असं शरद पवारांना सांगितल्याचं नाना काटे म्हणाले आहेत.
एकीकडे महायुतीकडून भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी जाहीरही केली. तरीही महाविकास आघाडीमध्ये या मतदारसंघात उमेदवार निश्चित झाला नाही. शरद पवार आता शंकर जगताप यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-विधानसभा निवडणूक: 21 मतदारसंघांतून पहिल्याच दिवशी तब्बल 735 उमेदवारी अर्ज दाखल
-महाविकास आघाडीचा उमेदवार ठरेना! चंद्रकांत पाटलांनी प्रचारही सुरू केला; उमेदवारी अर्जही दाखल करणार
-खेड-शिवापूरमध्ये सापडलेल्या पैशाबाबत रोहित पवारांचं वक्तव्य; “पहिली २५ कोटींची खेप पोहचली”
-कसब्यात धंगेकर अडचणीत? काँग्रेसमधील मुस्लिम नेत्याची आक्रमक भूमिका, थेट घेतली जरांगे पाटलांची भेट
-चंद्रकांत पाटलांचं ठरलं! कोथरुडकरांच्या साक्षीने २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज