पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली. तर दुसरीकडे पोटनिवडणुकीत बंडखोरी करणारे माजी नगरसेवक राहुल कलाटे हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.
आज राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्यध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते शरद पवारांची देखील भेट घेऊन पक्षप्रवेशाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिला तर राहुल कलाटे आजच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
एकीकडे राहुल कलाटे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी वरिष्ठांच्या भेटी घेत आहेत तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे देखील तुतारी फुंकण्यासाठी उत्सुक आहेत. चिंचवड मतदारसंघ भाजपकडे जाणार असल्याचे संकेत मिळाल्यापासून नाना काटे हे तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहेत. त्यातच राहुल कलाटे आणि नाना काटे हे दोन्ही नेते चिंचवडमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत इच्छुकांची मोठी गर्दी झाली असून आता शंकर जगतापांना नेमकं कोण आव्हान देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींसह चौघे ताब्यात; शहाजीबापू पाटील अडचणीत, नेमकं काय कनेक्शन?
-Pune: बागवे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत? व्हिडीओ शेअर करत थेट सांगितलं…
-अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?
-Assembly Election: अजितदादांचं ठरलं! येत्या २८ तारखेला कन्हेरीत फुटणार प्रचाराचा नारळ