पुणे : कश्मीरमध्ये लष्कराच्या मदतीने पुतीन बालन ग्रुपने छत्रपती शिवाजी महारांचा भव्य पुतळा उभारला आहे. या पार्श्वभूमीवर ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी आणखी एक घोषणा केली आहे. ‘विश्व हिंदू मराठा संघा’च्यावतीने स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने डेक्कन येथे आयोजित कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
“लष्कराच्या सहकार्याने काश्मीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून महाराजांच्या या पुतळ्याकडे बघून जवानांना प्रेरणा मिळते. त्याचप्रमाणे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि भव्य स्मारक जम्मू-काश्मीरमध्ये उभारु”, अशी घोषणा पुनीत बालन यांनी केली आहे.
“छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारखा योद्धा या युगात झालेला नाही. मी भारतीय लष्करासमवेत काश्मीरमध्ये काम करतो. आपले भारतीय सैनिक जेव्हा युद्धाला जातात तेंव्हा ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम डोळ्यासमोर ठेवून लढत असतात. त्यांची ही प्रेरणाच आपल्या शूर जवानांना लढण्यासाठी मोठे बळ देत असते. काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याठिकांणी रोज सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या पुतळ्याची आरती केली जाते”, असे यावेळी बोलताना पुतीन बालन यांनी सांगितले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रमाणेच कश्मीरमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा पुतळा आणि स्मारक लष्कराच्या सहाय्याने आणि ‘पुनीत बालन ग्रुप’च्या माध्यमातून विश्व हिंदू मराठा संघाला सोबत घेऊन उभारले जाईल. महाराजांच्या पुढील वर्षीच्या जयंतीच्या आधी स्मारकाचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही यावेळी पुनीत बालन यांनी दिली आहे. यावेळी शहरातील प्रतिष्ठित मंडळी, शिव-शंभू भक्त आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘पोर्शे कार प्रकरण अन् आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ’; ४ जूननंतर सुषमा अंधारे करणार धक्कादायक खुलासे
-धक्कादायक: विशाल अग्रवालचे डॉ. तावरेंसोबत २ तासात १४ फोन; ब्लड सॅम्पल बदलण्याचा प्लॅन कोणाचा?
-पोलीस कारवाईचा बार मालकांनी घेतला धसका, “आता टेबलवर ग्राहकांना दिला जातोय….”