पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनेकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अजित पवारांनी शनिवारी वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या परिसरातील विकासकामांच्या भूमिपूजनावेळी एक नवा वाद ओढवून घेतला आहे. सभेत भाषण करताना अजित पवार यांनी एक घोडचूक केली.
अजित पवार भाषणावेळी संभाजी महाराजांची प्रशंसा करत होते. तेव्हा बोलण्याच्या ओघात अजित पवार यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या आयुष्यात एकही ‘निवडणूक’ हरले नाहीत. खरंतर संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत, असे अजित पवारांना म्हणायचे होते. परंतु, भाषणाच्या ओघात त्यांच्या तोंडातून लढाईऐवजी निवडणूक हा शब्द निघाला. त्यावेळी व्यासपीठावर बसलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच अजित पवार यांना चूक लक्षात आणून दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी लगेच झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
“लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे त्याशिवाय दुसरं काही सूचत नाही. पण आमच्यातील देवेंद्र फडणवीस हे निष्णात आहेत. असं काही झालं की लगेच तिथल्या तिथे लक्षात आणून देतात. पुढे काही चुका झाल्या तर अशाचप्रकारे आमच्या लक्षात आणून द्या”, असं म्हणत अजित पवारांनी फडणवीसांचे आभारही मानले आहेत.
अजित पवार यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरुन आता विरोधकांकडून अजित पवार यांना टीकेचे लक्ष्य केले जाऊ शकते.
महत्वाच्या बातम्या-
-कसबा गणपती मंदिरात जाताना ‘या’ गोष्टी लक्षात घ्याच; पाळावे लागणार आहेत नियम
-ड्रग्ज प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक; ४५ कोटी रुपयांचे एमडी जप्त
-मुख्यमंत्र्यांसह फडणवीस अन् अजितदादा स्टेजवर, शरद पवार बोलायला उठताच बारामतीकरांचा जल्लोष
-सुप्रिया सुळे, शरद पवार मंचावर असताना मुख्यमंत्री म्हणाले, “आमचं सरकार राजकारण विरहित”
-“तरुणांना रोजगाराची गरज, राजकारण सोडून एकत्र यावं”; ‘नमो महारोजगार मेळव्या’त शरद पवारांचं वक्तव्य