पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होती. आज या निवडणुकीचा पावचा टप्पा पूर्ण झाला. राज्यातील सर्व भागांचे मतदान पार पडले. निवडणुकीची उमेदवारी, प्रचार, बैठक, गावदौरे, विरोधकांवर टीका-टीपण्णी मतदान हे सर्व झाल्यानंतर निवडणुकीचा अखेरचा टप्पा म्हणजे निवडणुकीचा निकाल. येत्या ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सर्व टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र लिहले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता या स्वप्नासाठी भारावून अहोरात्र काम करत होता. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा मला सार्थ अभिमान आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र
लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता. ते स्वप्न होते, आदरणीय @narendramodi जी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे… विकसित भारताचे…!
४ जूनला आपण… pic.twitter.com/BucuHDihZV— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 20, 2024
४ जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू. आपले सर्वांचे मनापासून आभार, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात पुढील ४ दिवस पावसाची जोरदार शक्यता; हवामान खात्याने दिले अपडेट…
-बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार; राज्य मंडळाकडून निकालाची तारीख जाहीर
-Pune Accident | आरोपी वेदांत अगरवाल न्यायालयाने घातल्या ‘या’ अटी, शर्तींवर दिला जामीन, १५ दिवस…