पुणे : राज्य सरकारची राज्यातील महिलांसाठी सुरु असलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ सत्ताधारी यशस्वी ठरलेल्याचं म्हणत आहेत. तर विरोधकंकडून ही योजना बंद अयशस्वी ठरत असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता पुन्हा एकदा या योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘लाडकी बहीण योजना ही यशाची गुरुकिल्ली ठरली आहे. महिलांच्या भावविश्वाशी जोडली गेलेली ही योजना बंद करणे हा महिलांशी केलेला द्रोह ठरेल. त्यामुळे कोणीही संवेदनशील राजकारणी ही योजना बंद करण्याचा निर्णय घेणार नाही,’ असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केले आहे.
‘लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशामध्ये शिवराजसिंह चौहान यांनी पहिल्यांदा मांडली, यशस्वीही केली. पुढे झारखंड पाठोपाठ महाराष्ट्रातही ती यशस्वी ठरली. आता दिल्लीतही ही योजना राबविण्याचे आश्वासन आम आदमी पक्ष आणि काँग्रेसनेही दिले आहे,’ असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ठाकरेंची साथ सोडली भाजपमध्ये प्रवेश, तरीही नगरसेवक म्हणतात, ‘खरी शिवसेना ठाकरेंचीचं’
-‘घोडगंगा कारखाना’ अजित पवारांच्या रडारवर; मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, अशोक पवारांचं टेंशन वाढलं
-पुण्यात नेमकं चाललंय काय? शिपायानेच केला विद्यार्थिनींचा चेंजिंगरूममध्ये व्हिडिओ शूट
-वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला मुख्यबाजार पेठेत उभारू लागल्या, तक्रार करण्यासाठी आमदार थेट पोलिसांत
-महिला कर्मचाऱ्यांचा सुरक्षेसाठी भाजप महिला आघाडी आक्रमक; पोलीस आयुक्तांची घेतली भेट