पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. राजकीय समीकरणं अशी काही बदलली आहेत की, नाईलास्तव अनेक कट्टर विरोधक हे महायुतीत एकत्र आल्याचे दिसून येत आहेत. इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे आणि भाजपचे हर्षवर्धन पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे आणि हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्यामुळे भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे महायुतीमध्ये सोबत आले आहेत.
‘देशात लोकसभा नावाचे लग्न असून, त्यासाठी सर्वजण मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे याबद्दल सर्वांचे एकमत झाले आहे. आमच्यात मतभेद असले, तरी ते आम्ही चर्चेने सोडवू’ असे सांगून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘अबकी बार ४०० पार’चा नारा महायुतीच्या बैठकीत पुण्यात दिला आहे.
LIVE | पुणे येथे पत्रकारांशी संवाद .. https://t.co/XMiOJqyYV2
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 4, 2024
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये महायुतीत तक्रारी आहेत. स्थानिक नेत्यांकडून एकमेकांविरोधात पोलिस संरक्षणाची मागणी केल्याचा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘ज्या वेळी घरात मोठे लग्न असते, तेव्हा वेगवेगळ्या कारणाने विभक्त झालेले कुटुंब एकत्र येते. त्यानंतर जे पुन्हा वेगळे होतात किंवा आपण पुन्हा एकत्र येऊ या, असाही विचार होतो. देशात लोकसभा नावाचे लग्न असून, त्यासाठी सर्वजण मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. कुटुंबातील एखादी गोष्ट खटकत असेल, तर ते सांगण्याचे स्वातंत्र्य आहे.’
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादा, ही अप्रत्यक्ष कबुली तर नाही ना?; अमोल कोल्हेंचं ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
-मित्राला खासदार करायचंय! मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’
-हर्षवर्धन पाटलांनी केला धमकीचा आरोप; राष्ट्रवादीचा ‘हा’ नेता करणार गैरसमज दूर
-“बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता…”; अजित पवार स्पष्टच सांगितलं
-“मी छाती ठोकपणे सांगतो, जानकर कुठेही जाणार नाहीत”; चंद्रकांत पाटलांचा विश्वास