पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक झाली, पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळाही झाला. त्यानंतर आता सर्वांच्या नजरा लागल्या त्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे. कोणाला कोणते मंत्रिपद मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच आयटी हब, सर्व्हिस सेक्टर, शैक्षणिक पंढरी आणि स्थलांतरीतांचे माहेरघर बनत असलेल्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अजित पवार की चंद्रकांत पाटील या नावांमध्ये सध्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावा केला जात आहे. त्यातच पुण्यात एका कार्यक्रमानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधत अनेक राजकीय घडामोडी बाबत भाष्य केले.
“तुम्हाला पालकमंत्रीपद मिळावे, अशी मागणी कार्यकर्ते करीत आहेत. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांचं काय तर नेता देखील आपल्याला अधिकाधिक चांगलं मिळावं, अशी इच्छा व्यक्त करीत असतो. परंतु आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात. ज्यावेळी अनेक सहयोगी पक्ष सोबत घेऊन जायचं असतं, त्यावेळी नेहमीच समजूतदारपणा दाखवायचा असतो. भविष्यामध्ये काय दडलं आहे. याबद्दल मला माहिती नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
पुण्याच्या पालकमंत्रिपदी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून ‘आमच्याच नेत्याला संधी देण्यात यावी’, अशा मागणीला दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मागणीला जोर देखील धरला जात आहे. ‘महायुतीत जर काही झालं तर समजूतदारपणा दाखवायला हवा’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘लाडकी बहीण योजनेचे २१०० नाही तर ३ हजार रुपये द्या’; सुप्रिया सुळेंची मागणी
-पुणे महापालिकेने नागरिकांच्या दारात वाजविला बँड; ४ दिवसात कोट्यावधींची वसूली
-मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा असाही रेकॉर्ड, तब्बल ४१९ कोटींची केली वैद्यकीय मदत
-मुख्यमंत्री होताच फडणवीसांनी पुण्यातील रुग्णाला केली ५ लाखांची मदत
-एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?; केसरकर म्हणाले, ‘ते मोदी-शहांचं…’