पुणे : राज्यात लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीत आहेत. त्यातच आता भाजपने पुणे मतदारसंघासाठी आपली ताकद पणाला लावत आहे. पुणे शहरात विविध विकासकामांच्या भूमिपूजनासारखे कार्यक्रम पार पडत आहेत. खडकवासला पाठबंधारे विभागाच्या जागेमध्ये पर्यटन विभागाच्या माध्यमातून होत असलेल्या ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही जागा बळकण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच ‘कोणाच्या घशात जाण्याअगोदर खडकवासल्याच्या ऑक्सिजन पार्कचे काम आमदार भीमराव तापकीर यांनी सुरु केलं याचं मला फार कौतुक आहे’, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला गार्डन म्हणून आपल्याला आनंद घेता येईल असं 1 पार्क इथे उभं राहणार आहे. या ऑक्सिजन पार्कची पायाभरणी केलीय. या कामासाठी भीमराव तापकीर यांनी निधी मिळण्यासाठी खूप प्रयत्न केले. निधी मिळावा म्हणून कामदेखील सुचायला हवी, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याचा प्रशांत महाराजांकडून निषेध; म्हणाले…
-पुण्यात भाजपचे इव्हेंट वॉर; इच्छुक उमेदवार सुनिल देवधर मात्र एकाकी
-टिईटी घोटाळ्यातील आरोपीचे एक कोटिचे दागिने न्यायालयाकडून परत!!
-सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
-अयोध्येतील राम मंदिरानंतर लवकरच मथुरेत श्रीकृष्ण मंदीर; फडणवीसांचा विश्वास