पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. जागावाटपाचा प्रश्न, प्रचाराची सुरवात, पक्षांतर करणाऱ्यांचा नेत्यांची गडबड असा सगळा गोंधळ सुरु आहे. आता महायुतीच्या जागावाटपाचं अद्याप तेढ पुर्णपणे सुटलेलं नाही. अशातच भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीच्या जागेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
“भाजपने अतिशय विचारपूर्वक लोकसभा उमेदवारांची निवड केली असून पक्षाला आणखी ४ जागा मिळणार आहेत. त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल. बारामतीची जागा अजितदादांच्याच गटाला जाणार आहे. पक्षाने दिलेला आदेश आम्ही पाळू”, अशी माहिती भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
भाजपने अतिशय विचारपूर्वक उमेदवारांची निवड केली असून महाराष्ट्रातील २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकांचा पाठिंबा असलेल्या नेत्यांना संधी दिली आहे. आम्हाला आणखी ४ जागा मिळणार असून ती यादी येत्या एक-दोन दिवसात जाहीर होईल”, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
“उमेदवार घोषणेनंतर अहमदनगरसारख्या काही ठिकाणी निर्माण झालेल्या वादाबद्दल छेडले असता, मतभेद असू शकतात. मात्र भाजपात मनभेद नाहीत. उमेदवारी घोषित होईपर्यंत सगळेच इच्छुक असतात. मात्र एकदा उमेदवारी घोषित झाली की आमच्या पक्षात विरोध राहत नसतो. नगरमध्येही सगळे एकत्र काम करतील”, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वसंत मोरे शरद पवारांच्या कार्यालयात पोहचले पण पक्षप्रवेशाविनाच परतले
-शरद पवारांच्या मंचावर आले पण प्रवेश टाळला; निलेश लंकेंना नेमकी भीती कशाची?
-विजय शिवतारेंनी केला प्रचाराचा श्रीगणेशा; कन्हेरीच्या मारुतीच्या चरणी नतमस्तक
-‘मावळचे पुढचे खासदार श्रीरंग बारणे हेच असणार’; उदय सामंत यांचा विश्वास
-मुरलीधर मोहोळांच्या प्रचाराचा नारळ फुटला; कै. गिरीश बापटांच्या प्रतिमेला अभिवादन