पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती भाजपला बहुमत मिळालं आहे. पुणे जिल्ह्यातील २१ जागांपैकी भाजप ८ शिंदेंची शिवसेना १ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८ अशा १८ जागांवर महायुतीला विजय मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयीस उमेदवारांची सदिच्छा भेट घेतली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी आमदार अण्णा बनसोडे यांच्या पक्ष कार्यालयाला भेट दिली असता पत्रकारांनी त्यांना गराडा घातला त्यानंतर त्यांनी हात जोडून बोलण्यास टाळले. त्यापूर्वी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांना चॉकलेट देऊन तोंड गोड केले आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाआधीच हात जोडल्याचे पहायला मिळालं.
चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यात मुख्यमंत्रिपदी नवीन चेहरा असू शकतो, असे भाकीत केले होते. त्यानंतर आता पुन्हा आज काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. अशातच प्रश्न आपल्याला पुन्हा येऊ शकतो हे लक्षात घेऊन चंद्रकांत पाटील यांनी हात जोडत प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. ‘मी दातांच्या उपचारासाठी शहरात आलो आहे’, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी कोणत्याही राजकीय विषयावर भाष्य करणं टाळलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘गरज भासल्यास या सरकारविरोधात सत्याग्रह’; डॉ. बाबा आढाव यांचे आत्मक्लेश उपोषण
-राज्यात ‘या’ दिवशी होणार सत्तास्थापन! महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला!
-एकनाथ शिंदे मन मोठं करून भाजपला मुख्यमंत्रिपद देतील; चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
-निवडणूक झाली तरीही काँग्रेसमधला वाद काही संपेना! काँग्रेस भवनात नेत्यांमध्ये नवा वाद