पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोथरुडमधील अंबर हॉल येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीची समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी ‘राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठी ही महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत’, असा विश्वास महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या बैठकीनंतर कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
“राज्यात महायुतीची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही ताकद एकवटून राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात युतीची ताकद मोठी असल्याने; महायुतीलाच जनतेचा कौल मिळेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाची भूमिका असेल”, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “राज्यातील मराठा समाजाला माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे यांच्या काळात आरक्षण मिळालं. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण गेलं. त्यामुळे मनोज जरांगे यांनी आमची चूक काय झाली ते तरी सांगावं, असे आवाहन करुन मराठा समाज याचा सकारात्मक विचार करेल.”
महत्वाच्या बातम्या-
-Pune: बागवे खरंच भाजपच्या वाटेवर आहेत? व्हिडीओ शेअर करत थेट सांगितलं…
-अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?
-Assembly Election: अजितदादांचं ठरलं! येत्या २८ तारखेला कन्हेरीत फुटणार प्रचाराचा नारळ
-भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर
-वडगाव शेरी भाजपकडे जाणार? सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली, देवगिरीवर घेतली अजितदादांची भेट