पुणे : शालेय शैक्षणिक २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीसाठी अभ्यासक्रम लागू होईल व पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन वर्षात दोन टप्प्यांमध्ये सीबीएसई पॅटर्न शालेय शिक्षणात राबवला जाणार आहे.
सीबीएसई पॅटर्न महाराष्ट्रात यंदाच्या वर्षांपासून लागू करण्यात येत असून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्नचा विचार केल्यास ७० टक्के सीबीएसई तर ३० टक्के राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंनी घोषणा केल्यानंतर राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक आणि आपल्या मुलांना शिक्षण देणाऱ्या पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, शासनाने तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, शासनाच्या धोरणानुसार यावर्षी पहिल्या इयत्तेला सिबीएससी अभ्यासक्रम असेल, त्यानंतर दरवर्षी एकेक इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला जाईल. त्यासाठी, शिक्षक व मुख्याध्यापकांना प्रशिक्षण दिला जाईल. सीबीएसई पॅटर्न लागू केल्याने शाळांमध्ये कुठलीही फी वाढ होणार नाही. सीबीएससी अभ्याक्रमातील इतिहास विषयात राज्य शिक्षण मंडळाच्या अखत्यारितील ३०% मध्ये शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराराणी आणि मराठा साम्राज्याचा इतिहास शिकवला जाईल. नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके छापण्याची जबाबदारी राज्य शिक्षण मंडळाची असणार आहे. यामध्ये मराठी हा अनिवार्य आहे. १ जूनला शाळा सुरू झाल्यानंतर लगेच शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘वाघ बाई स्वतःच्या राजकीय करियरसाठी…’; सुषमा अंधारेंची चित्रा वाघ यांच्यावर आगपाखड
-जयकुमार गोरेंवर विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करणाऱ्या महिलेला अटक; नेमकं कारण काय?
-स्वारगेट प्रकरणी पीडितेचा आवाज बसबाहेर गेला?; शिवशाहीची शास्त्रोक्त पडताळणी, काय माहिती मिळाली?
-धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; कोणी घडवून आणला हा प्रकार?