पुणे : पुणे शहरात इतकं सगळं घडूनही ड्रग्ज, गांजासारख्या अंमली पदार्थांची तस्करी कमी झाली नाही. गेल्या २-३ महिन्यांपूर्वी पुण्यात देशातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर पुणे पोलिसांसह महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र अजूनही पुणे शहरातील ड्रग्ज, गांजा तस्करी पूर्णपणे संपली नसल्याचे दिसून येत आहे.
ओडिसा राज्यातून महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात आलेला २ कोटी २० लाख रुपयांचा गांजा केंद्रीय सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी सोलापूर जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी सुधीर चव्हाण (वय ३२, रा. नरसिंगपूर, जि. सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे.
ओडिसातून मोठ्या प्रमाणात गांजा महाराष्ट्रात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या पुणे कार्यालयातील अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर एक पथक सोलापूर जिल्ह्यात पाठविण्यात आले. गांजा पाठविण्यात आलेल्या ट्रकची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा लावून ट्रक अडविला. ट्रकची तपासणी करण्यात आली. तेव्हा ट्रकमध्ये गांजा आढळला, अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली आहे.
सुधीर चव्हाण गांजा आणण्यासाठी ट्रक घेऊन ओडिसामध्ये गेला होता. गांजाची सोलापूर जिल्ह्यात विक्री केली जाणार होती. सोलापूरमधून गांजा राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये विक्रीसाठी पाठवले जाणार होते. गांजा विक्री, मात्र, सीमा शुल्क विभागाने ही कारवाई करत सुधीर चव्हाणचा आणि त्याच्या साथीदारांचा कट उलथून टाकला आहे. तस्करी प्रकरणात आणखी कोण सामील आहे का?, यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती वनगे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सावधान! बारामतीच्या अनेक भागात रात्रीचे फिरतायेत ड्रोन; काय आहे नेमका प्रकार?
-इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप
-अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ घर घेतले विकत; म्हणाली, ‘मला या घरात….’
-”त्या’ पराभवाची चीड माझ्या मनात निश्चितच, अजितदादांशी माझं बोलणं…’- संजोग वाघेरे