पुणे : महाराष्ट्रातील राजकीय परस्थितीवरुन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘अजित पवार यांच्याबद्दल मी बोलणार नाही. तो त्यांच्या पक्षाचा, त्यांच्या परिवाराचा विचार आहे. तरुण या सगळ्याला कंटाळले. म्हणून त्यांनी मला साथ दिली’, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी शिंदे गटावर आगपाखड केली आहे.
“शिंदे गटाला सत्तेचा माज आहे. राज्यातील जनता माज खपवून घेत नाही. त्यांचा धुवा उडणार आहे. सगळ्याच पक्षांची धुसफूस आहे. एकमेकांच्या विरोधात लढले. वरच्या नेत्यांनी युती केली. वरिष्ठ पातळीवरील नेते जिरवा-जिरवीच्या राजकारणात व्यस्त आहेत. एकनाथ शिंदेंनी खूप पैसे वाटले. हजारो कोटींचा वापर एकनाथ शिंदे यांनी केला आहे. हेलीकॉप्टरने पैसे वाटले. दादागिरीने राजकारण होत नाही. नाहीतर अरुण गवळी मुख्यमंत्री झाले असते, असे म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर तोफ डागली आहे.
‘महाराष्ट्राला नवा पर्याय देण्याची गरज आहे. मी राज्यभर दौरा करणार करुन गरीब, वंचित, तरुणांना राजकारणात आणणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर फक्त राजू शेट्टी लढले. मी अपक्ष होतो. सगळेच दावे करतात आम्ही येणार, आम्ही येणार, मी असे दावे करणार नाही. जो निकाल लागेल तो आम्हाला मान्य असेल’, असे रविकांत तुपकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे हिट अँड रन : ‘मुलांवर लक्ष ठेवा अन्यथा…’; अजित पवारांचा पालकांना इशारा
-पुणे विद्यापीठात सापडलेल्या अंमली पदार्थावर युवासेना आक्रमक; विद्यापीठ प्रशासनाला दिला ‘हा’ इशारा