पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. 2025च्या या अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना उत्पन्न कर माफ करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती तालुक्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात अजित पवार देशाच्या अर्थसंकल्पावर बोलताना इतर निर्णयांसह कृषी खात्यातील निर्णय चांगले घेतले असल्याचं म्हणाले आहेत.
‘मी देखील अर्थसंकल्प सादर करणार आहे. लाडक्या बहिणी आणि सर्वसामान्य जनता यांना केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर करणार आहे. सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, सहकार चळवळ संपुष्टात आली, तर खाजगीवाले कशीही पिळवणूक करतील. सहकारी संस्था टिकवण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल’, असे अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार अनेकदा कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांचीही फिरकी घेत असतात. तसेच काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना ते धारेवर धरत असतात. आता नुकतंच एका बँकेच्या मॅनेजरला अजित पवारांनी चांगलंच सुनवलं आहे. त्यांनी बारामती दौऱ्यावर असताना युनियन बँक ऑफ इंडियाच्या नवीन शाखेचे उद्धाटन केले आहे. यावेळी अजित पवारांनी बँकेच्या मॅनेजरला “आप पान खाते हो क्या? हमें बेवकुफ समजे क्या? व्यसनाने कॅन्सर होतो”, असे अजित पवारांनी सांगितले आणि त्यानंतर त्यांनी भाषण केले आहे.
‘तालुका आणि शहरात सर्व प्रकारची विकासकामे दर्जेदार पद्धतीने करुन बारामती एक आदर्श शहर म्हणून देशात उदयास आलं पाहिजे, बारामती तालुका देशात विकासकामांच्या बाबतीत क्रमांक एकचा तालुका म्हणून करायचा आहे, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांचं पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे काम करण्यात येणार आहे. तालुक्यात विविध विकासकामं सुरू असून याकरता नागरिकांनी सहकार्य करावं’, असं आवाहन पवार यांनी बारामतीत केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune GBS: पुणेकरांना दिलासा! ससून रुग्णालयातून ‘जीबीएस’च्या पाच रुग्णांचा डिस्चार्ज
-एलआयसी पॉलीसीच्या नावाखाली फ्रॉड, पण पुणे पोलिसांनी शेवटी ‘त्या’ टोळीला बेड्या ठोकल्याच
-मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!
-Budget 2025: आता १२ लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त; केंद्रीय अर्थसंकल्पातून सामान्यांसाठी काय?