पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातातील मुख्य आरोपी अल्पवयीन असलेल्या वेदांत अग्रवालचे वडिल प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवालला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. विशाल अग्रवालसा न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच बार मालक आणि व्यवस्थापकाला देखील पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
विशाल अग्रवाल हे पुण्यातील प्रसिद्ध ब्रह्मा कॉर्पचे मालक आहेत. त्याचे चिरंजीव वेदांत अग्रवालने मध्यधुंद अवस्थेत रविवारी मध्यरात्री शहरातील कल्याणीनगर भागात आपली अलिसान पोर्श कार भरधाव वेगाने चालवताना दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जीव गेला. संतप्त जमावाने वेदांतला बेदम चोपही दिला. त्यानंतर वेदांतवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी तशी झाली नाही म्हणून संतप्त नागरिकांनी तसेच सर्व क्षेत्रातून टीकेची झोड उठवली.
व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत राजकीय दबाव असल्याचा आरोपही केला. त्यानंतर आरोपीचे वडील विशाल अग्रावाल यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करत ताब्यात घेतलं. त्यानंतर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘मध्यरात्री किती लोकांसाठी पोलीस स्टेशनला गेलात?’ अंबादास दानवेंचा सुनिल टिंगरे, अजितदादांना सवाल
-‘संपूर्ण अग्रवाल कुटुंब क्रिमिनल, त्यांच्यावर राजकीय वरदहस्त’; सेना नेते अजय भोसलेंचे गंभीर आरोप
-नंबरप्लेट नसताना वाहन चालवत असाल तर सावधान, आरटीओचे मोठे पाऊल; वितरक अडचणीत येणार