बारामती : बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. आज सगळ्या मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे तर महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या. आजच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत.
सुप्रिया सुळे या १४०७३ मतांनी आघाडीवर आहेत. तर सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. यावरुन सुप्रिया सुळे गड राखतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीचा हा सामना शरद पवार आणि अजित पवार असा रंगला होता. प्रतिष्ठेची लढाई असून बारामती मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांमध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर आहेत. तसेच बारामतीत सुद्धा सुप्रिया सुळे आघाडी आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दुसऱ्या फेरी अखेर पुण्यात मोहोळ आघाडीवर, पहा कोणाला किती मते
-पहिल्या फेरी अखेर पुण्यात काय परिस्थिती? मोहोळ की धंगेकर आघाडीवर? पहा Live निकाल
-Weed | महाराष्ट्रात गांजा विक्री सुरुच; ओडिसावरुन आला २ कोटींचा गांजा
-सावधान! बारामतीच्या अनेक भागात रात्रीचे फिरतायेत ड्रोन; काय आहे नेमका प्रकार?