पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तब्बल २ वर्षांनंतर जामीन मंजूर झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांशी जवळीक असणाऱ्या भोसलेंना येस बँक आणि डीएचएफएलच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी २६ मे २०२२ सीबीआयने अटक केली होती.
अविनाश भोसले यांच्यावर ईडीने २८ जून २०२२ रोजी भोसले यांना अटक केली होती. आता सक्तवसुली संचालनालयाने नोंदवलेल्या गुन्ह्यात ते दोषी असल्याचे पुराव्यांतून दिसून येत नाहीत, असे निरीक्षण न्यायालयाने त्यांना दिलासा देताना प्रामुख्याने नोंदवले आहे. त्यामुळे भोसलेंना २ वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे.
अविनाश भोसलेंवर काय आरोप होता?
येस बँकेचे संस्थापक आणि प्रकरणातील मुख्य आरोपी राणा कपूर यांच्याकडून निधी वळविण्याच्या बदल्यात भोसले यांना लाच मिळाली होती. येस बँकेने दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला ४ हजार कोटीं रुपये वितरीत केले होते. ही रक्कम गुन्ह्याशी संबंधित असून डीएचएफएलने या रकमेपैकी १ हजार २४० कोटी रुपये प्रकरणातील सहआरोपी संजय छाब्रिया यांच्या अध्यक्षतेखालील रेडियस ग्रुपच्या ३ गटांना कर्ज म्हणून वितरित केली होती. डीएचएलएफकडून हे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी भोसले यांना रेडियस ग्रुपकडून देखील ३५० कोटी रुपयांची लाच मिळाली असल्याचा ईडीचा आरोप आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे जिल्ह्यात २१ दिवसात मतदार संख्येत लाखोंनी झाली वाढ; आकडेवारी आली समोर
-भाजपची गुंडांशी जवळीक; गुंड गजा मारणेंने केला चंद्रकांत पाटलांचा सत्कार, व्हिडीओ व्हायरल
-..तर लाडकी बहीण योजनाच बंद करू, न्यायालयाने सरकारला फटकारले; नेमकं काय घडलं?
-पुणे हिट अँड रन प्रकरण: आरोपी मुलावर कारवाई करण्याबाबत पोलिसांनी केली ‘ही’ मोठी मागणी
-‘सरकारने आमच्या दैवताचा अपमान करू नये’; सुप्रिया सुळेंचे बारामतीत आंदोलन