बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर आता अजित पवारांनी विधानसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. बारामतीत येत्या १४ जुलै रोजी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जनसन्मान मेळावा घेणार आहे. त्यासाठी अगदी २५ हजार कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक व्यवस्था केली जाणार आहे. बारामतीच्या मिशन हायस्कूल मैदानावर ही सभा होणार आहे.
या सभेपूर्वीच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी या सभेत मोठा धमाका होणार, असे सांगितले आहे. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून असा नेमका काय धमाका होणार याची मात्र यानिमित्ताने उत्सुकता शिगेला पोचली आहे. ‘विकासाचा राष्ट्रवादी विचार घेऊन येत आहे राष्ट्रवादीची ‘जन सन्मान रॅली’. दिनांक १४ जुलै ठीक दुपारी २ वाजता बारामतीच्या मिशन हायस्कुल मैदानावर मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि आपले समर्थन दर्शवा. चला नवा महाराष्ट्र घडवूया’, असे म्हणत अजित पवारांचे बारामतीमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभेच्या तयारीसाठी बारामतीमध्ये १४ जुलै रोजी आयोजित केलेल्या सभेमध्ये अजित पवार काय धमाका करणार आहेत? याची उत्सुकता आता शिगेली पोहचली आहे. सध्या बारामतीकरांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा उलगडा अजित पवार करु शकणार का? हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! अक्षय कुमार कोरोना पॉझिटिव्ह; ‘सरफिरा’ सिनेमाच्या अनेक सदसस्यांनाही कोरोनाची लागण
-धक्कादायक! पुण्यात तब्बल ४९ शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाकडून कारवाई सुरु
-वादाच्या घेऱ्यात असलेल्या पूजा खेकरचे बारामती कनेक्शन उघड; अडचणीत होणार वाढ