पुणे : येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळे सुभाष भामरे, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांची नावं आहेत. पुण्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचेही नाव आहे.
या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावाची यादी केव्हा जाहीर होते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण २० उमेदवारांचा समावेश आहे. नितीन गडकरी यांना नागपूर, अहमदनगरमधून सुजय-विखे पाटील, माढामधून रणजीत निंबाळकर, बीडमधून पंकजा मुंडे, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
The BJP Central Election Committee has decided on the following names for the upcoming Lok Sabha elections.
(2/2) pic.twitter.com/UAUnTtrput
— BJP (@BJP4India) March 13, 2024
दरम्यान, पुणे लोकसभेसाठी आमदार जगदीश मुळीक, सुनिल देवधर, शिवाजीराव मानकर या नावांची चर्चा होती. मात्र मुरलीधर मोहोळ यांचे नाव वर्णी लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मुरलीधर मोहोळांचा वसंत मोरेंना फोन; भाजपमध्ये जाणार? मोरे म्हणाले, ‘मी माझा निर्णय..’
-“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”
-पुण्यात राजकीय हालचाली वाढल्या; काँग्रेसचा बडा नेता वसंत मोरेंच्या भेटीला
-वसंत मोरेंचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’; ‘या’ पक्षात प्रवेश करणार