पुणे : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज त्यांचे ‘संकल्पपत्र’ जाहीर केले आहे. भाजपच्या या संकल्पपत्रावर महायुतीचे उमेदवार भाजपचे नेते आणि पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ प्रतिक्रिया दिली आहे.
“लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी जी यांच्या गॅरेंटीचा दस्तावेजच आहे. हे संकल्प पत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठीचा जणू रोड मॅपच दिलेला आहे. जनसंघ आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रत्येक संकल्पपत्रात अयोध्येत श्री राम मंदीर बांधणे आणि काश्मिरमधील ३७० कलम हटवण्याबरोबरच समान नागरी देशात आणण्याचा संकल्प पक्षाने केला होता”, असं मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
सांस्कृतिक स्थळांच्या आणि वारशांच्या विकासासाठी ‘मोदी की गारंटी’ !#ModiKiGuarantee #AbkiBaar400Paar #PuneWithModi #MurlidharMohol4Pune pic.twitter.com/JfsuoJpLf2
— Murlidhar Mohol (Modi Ka Parivar) (@mohol_murlidhar) April 14, 2024
“देशातील मतदारांनी पंतप्रधान मोदीजींवर विश्वास ठेवून केंद्रात बहुमताने सलग दोन वेळा सरकार निवडून दिले आणि देशवासीयांना अयोध्येत रामाचे दर्शन घेता येऊ लागले, तसे काश्मिरमध्ये मुक्तसंचार करता येऊ लागला आहे. पुढील पाच वर्षात समान नागरी कायद्यासह काही मोठी उदिष्ट ठेवली आहेत. ती सर्व पूर्ण होतील, या मोदीजींच्या गॅरेंटीवर देशवासीयांचा आणि पुणेकरांचा विश्वास आहे. देशवासीयांच्या विश्वासावरच हे मोदीजींच्या गॅरेंटीचे संकल्पपत्र देशवासियांसमोर मांडले आहे”, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-देशात पुणे, मुंबईमध्ये सर्वाधिक घरांची विक्री; गेल्या तीन महिन्यात १ लाखांपेक्षा जास्त घरे विक्री
-‘पुण्यकर्माच्या बदल्यात स्वर्गप्राप्ती करुन देतो’ म्हणत भोंदूनी डॉक्टरांना घातला ५ कोटींचा गंडा
-“सून म्हणून माझी निवड शरद पवारांनीच केली”; शरद पवारांच्या वक्तव्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया