पुणे : महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जनतेने चांगला प्रतिसाद दिला असून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“लोकसभा निवडणुकीत असे वातावरण होतं की भाजपच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं. त्यामुळे जनतेचे आम्ही आभार मानतो. लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी एक लढाई होती. मला माझा अभिमान आहे, कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व नागरिकांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला जो कौल दिला त्यामुळे हा विजय झाला. पण हा विजय अंतिम नाही तर ही लढाई सुरू झाली आहे”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत.
Shivsena #LIVE | UddhavSaheb Thackeray | पत्रकार परिषद | यशवंतराव चव्हाण सेंटर हॉल, नरीमन पॉइंट, मुंबई ➡️ https://t.co/v5PMSJUQ2l
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) June 15, 2024
“आता २-३ महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक येईल. मोदी सरकार हे आता एनडीएचं सरकार झालं आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस चालेल हा मोठा प्रश्न आहे. दिल्लीत आमच्याबाबत जे म्हटले जायचे की, नैसर्गिक आणि अनैसर्गिक युती. मग आता दिल्लीतील युती नैसर्गिक आहे की अनैसर्गिक हा प्रश्न आहे. देशातील जनता या निवडणुकीच्या निमित्ताने जागी झाली, त्यामुळे हे मोठे यश आहे असे मी मानतो”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणाले आहेत.
“लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचार करताना इंडिया आघाडीला मते दिले तर तुमची संपत्ती मुस्लिमांना देतील असा प्रचार केला. तसेच मंगळसूत्र याबाबतही नरेटिव्ह भाजपने केले होते. मी नकली संतान हेही नरेटीव्ह होते”, अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात; विमानतळावर जंगी स्वागत
-आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणाचा तपास आता पुणे पोलिसांनी कोणाकडे सोपवला?
-गजा मारणेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके म्हणतात, ‘मी त्याच्या घरी…’
-विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य