पुणे : एकीकडे राज्यात बीड सरपंच हत्या प्रकरणावरुन संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या व्यक्तींचे राजकारण्यांशी संबध असल्याने सत्ताधारी विरोधकांमध्येही आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. अशातच आता पुणे विमानतळावर एका भाजपच्या युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि २८ जिवंत काडतुसे आणि दोन मॅगझिन सापडल्याने खळबळ उडाली आहे.
‘इंडिगो’च्या पुणे-हैदराबाद विमानाने प्रवास करणाऱ्या दिपक काटे नावाच्या प्रवाशाच्या बॅगेत पिस्तुल आणि २८ जिवंत काडतुसे आढळून आल्यानंतर पुणे एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणेकडून दिपक काटेला अटक करण्यात आली आहे. दिपक काटे हा मूळचा पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा रहिवाशी असून भाजपचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं आहे. दिपक काटे हा शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचा संस्थापकही आहे.
सोशल मीडियावर दिपक काटेचे भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो दिसून येत असल्याने आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते, मुरलीधर मोहोळ या नेत्यांसोबत त्यांचे फोटो पाहायला मिळत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादा तुमचं काय अडकलंय धनंजय मुंडेंपाशी? भर सभेत सुरेश धस यांचा सवाल
-संतोष देशमुख प्रकरणी पुण्यात जन आक्रोश मोर्चा; मनोज जरांगे पाटील मोर्चा अर्धवट सोडून का गेले?
-जनआक्रोश मोर्चाला पुण्यातील आमदार अन् खासदार गैरहजर; सुरेश धस म्हणाले “त्यांना रविवारी…”
-‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा
-पुणेकरांनी घेतली भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या नामस्मरणाच्या साधनेतून आत्मशांतीची दिव्य अनुभूती