पुणे : पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडी हा प्रश्न दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावर प्रशासनाकडून अनेक उपाययोजना, नियम, अटी असे अनेक प्रयत्न केले मात्र, अद्यापही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. अशातच आता पुणे शहर भाजपने पुढाकार घेतला आहे. पुण्यातील भाजपचे १०० कार्यकर्ते आठवड्यातून १ दिवस शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना मदत करणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी आज भाजपच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि शहर वाहतूक उपायुक्त रोहिदास पवार यांची भेट घेतली. शहराच्या विविध भागातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पोलिसांनी तयार केलेल्या योजनांची माहिती पाटील यांनी यावेळी शिष्टमंडळाला सादरीकरणातून दिली. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका आणि अन्य विभागांचे सहकार्य पोलिसांना मिळावे यासाठी मदत करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले आहे.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट
पुण्यातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने शनिवारी अतिरिक्त पोलिस आयुक्त श्री. मनोज पाटील आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त श्री. रोहिदास पवार यांची भेट घेतली. पुण्यात… pic.twitter.com/lQnMSAyPWr
— Dheeraj Ghate (Modi Ka Parivar) (@DheerajGhate) August 3, 2024
शहर भाजपचे सरचिटणीस वर्षा तापकीर, रवींद्र साळेगावकर, बापू मानकर, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सचिव सुशील मेंगडे, निवेदिता एकबोटे, महिला आघाडी अध्यक्ष हर्षदा फरांदे नगरसेवक अजय खेडेकर, महेश गलांडे ,प्रसन्न दादा जगताप हरिदास चरवड उमेश गायकवाड. प्रल्हाद सायकर, मानसी देशपांडे, नगरसेविका नीलिमाताई खाडे, गायत्री खडके, मंजुषा नागपुरे, प्रियांका शेंडगे, प्रतीक देसरडा, प्रशांत सुर्वे, आनंद पाटील, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, गिरीश खत्री, विष असे सर्वजण उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या-
-‘ढेकणाला आव्हान द्यायचं नसतं, त्यांना…’; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिली ढेकणाची उपमा
-मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…
-पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?