पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीला विशेषत: भाजपला मोठे बहुमत मिळाले आहे. या यशामध्ये फार काळ न रमता भाजपने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात भाजपकडून सदस्य नोंदणी राबवण्यास सुरवात केली आहे. महायुतीने विधानसभेत मिळालेल्या विजयानंतर आता महापालिकेवर भगवा झेंडा फडकविण्याचा निर्धार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, महाविकास आघाडीला अद्याप हा पराभव होऊनही महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने कुठलीही हालचाल दिसत नाही. विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि मतदान यंत्रांवरील आक्षेप यामध्येच आघाडी अडकली असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला. मात्र, त्यानंतर भाजपने ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित असा विजय मिळवला. या विजयामुळे शहर भाजपचा आत्मविश्वास उंचावल्याने आता अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे.
भाजपकडून ८ विधानसभा मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य करण्याचा आणि प्रत्येक प्रभागात कमीत कमी १० हजार सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प करण्यात आला.
‘भाजपकडे येणाऱ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी मोहीम सुरू केली आहे. त्याचा एक भाग म्हणून शहरामध्येही सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणार आहे’, असे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-लोकसभा, विधानसभा झाली तरीही पवार विरुद्ध पवार सामना सुरुच; बारामतीत नेमकं काय घडतंय?
-पुण्यात १४ ते २२ डिसेंबर पुस्तक महोत्सव; मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन
-सतीश वाघ हत्या प्रकरणी पोलिसांकडून चौघे ताब्यात; धक्कादायक माहिती आली समोर
-बांग्लादेशी रोहिंग्यानं पुण्यात घर घेऊन थाटला संसार; अवघ्या ५०० रुपयांत काढलं खोटं आधारकार्ड