पुणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेला पराभव बाजूला सारत विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उद्या पुण्यातील बालेवाडी येथे राज्य कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली असून जवळपास 5000 च्या वर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. याच माध्यमातून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार असून एकप्रकारे भाजपकडून विधानसभेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये भाजपची मोठी पीछेहाट झाली, 24 खासदारांची संख्या थेट ९ वर पोहोचल्याने भाजपला मोठा धक्का बसला. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होईल, तत्पूर्वी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना सोबत असणारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जागा वाटपावरून देखील विचार मंथन या बैठकीत होऊ शकते. खुद्द अमित शहा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याने ते नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
राज्यभरातील ५ हजारांच्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीला येणार असल्याने जय्यत तयारी करण्यात आली आहे. बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सकाळी १० वाजता बैठकीला सुरुवात होईल.
महत्वाच्या बातम्या-
-आधी म्हणाले, ‘मित्राचा मुलगा’ आता शरद पवार त्यांनाच म्हणाले ‘फडतूस माणूस’
-आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली, वेटींग लिस्ट लागली; वाचा कधीपासून प्रवेश सुरु?
-वसंत मोरेंना ‘तो’ फोन कोणी केला? मोरेंच्या आरोपावरुन पुण्याच्या राजकारणात खळबळ
-‘गुलाबी मंच अन् गुलाबी कोट’, अजित पवारांच्या ‘त्या’ गुलाबी कोटचं रहस्य काय?