पुणे : आगामी लोकसभा निवडणूक ही येत्या एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली. महाविकास आघाडी आणि महायुतीतील मित्रपक्षांनी मतदारसंघात आपल्याच उमेदवाराला विजय मिळणार हे मानून संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी चाचपणी सुरु आहे.
महायुतीकडून यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. पण अद्यापही महायुतीला पुणे लोकसभेसाठी उमेदवार मिळेना झाला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला येण्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे भाजपकडून वरिष्ठ पातळीवर पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदावाराची चाचपणी सुरु आहे.
भाजपकडून उमेदवार निश्चित करण्यासाठी आत्तापर्यंत ३ ते ४ सर्व्हे करण्यात आले आहेत. पण, उमेदवार अद्याप निश्चित झाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण लोकप्रियतेच्या निकषावरती करण्यात येत असून, त्याआधारे लोकसभेचा उमेदवार ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपच्या सर्व्हेची इच्छुक उमेदवारांना कुणकुण लागली होती. त्यामुळे भाजप नेत्यांचं मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रम राबवत ‘इव्हेंट वॉर’ सुरु होतं. आपली लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून करण्यात आला. सध्या भाजपमधून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, भाजप नेते सुनील देवधर यांची नावे लोकसभा उमेदवारीसाठी समोर येत आहेत. भाजपने केलेल्या सर्व सर्व्हेंनंतर आता पक्षश्रेष्ठी पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे पोलीस सॅम ब्राऊनच्या शोधात; ३ महिन्यात २ हजार किलो ड्रग्ज बनवण्याचं टार्गेट
-“येणाऱ्या काळात अजित पवार एकटे पडतील, भाजप नेहमीच मित्रपक्षाला संपवतं”
-पिंपरी महापालिकेच्या बजेटमध्ये या ३ आमदारांना झुकतं माप; चिंचवडच्या पदरी भरीव निधी
-अजित पवारांना मोठा धक्का, सख्या पुतण्याच शरद पवारांसोबत; बारामतीत नेमकं घडतंय काय?
-शिवाजीनगर पोलिसांची जबरदस्त कामगिरी; चोरी करुन कोयते बाळगणाऱ्यांना ठोकल्या बेड्या