पुणे: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. 51 टक्क्यांची लढाई जिंकण्यासाठी बूथ पातळीपर्यंत यंत्रणा सक्षम करण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. याचा भाग म्हणून पुणे लोकसभेत येणारे २०१० बुथवर “बूथ चलो अभियान” राबवले जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.
देशभरात भाजपकडून गाव चलो अभियान राबवले जात असून शहरी भागामध्ये हे बूथ चलो अभियान असणार आहे. ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान हा उपक्रम राबवण्यात येईल. नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासह पक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रियपणे यामध्ये सहभागी असतील. याबद्दल आज कार्यशाळा देखील पार पडली असल्याचं घाटे यांनी सांगितल आहे.
भाजपा नेहमीच निवडणुका जिंकण्यासाठी आग्रही असतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने चार ते पाच हजार कार्यकर्ते वेगवेगळ्या बुथवर जाऊन हा उपक्रम राबवतील. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील बुथप्रमुखांची कार्यशाळा देखील घेण्यात येणार असून याचा सर्व रिपोर्ट प्रदेशाकडे पाठवण्यात येणार आहे.