पुणे : देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं. निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला सुरवात करतील. काही नेत्यांनी आपला प्रचार सुरुही केला आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यांनी प्रचारही सुरु केला आहे. मात्र मावळ लोकसभा निवडणुकीसाठी महहायुतीमध्ये अद्यापही रस्सीखेच सुरुच आहे. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नावाची चर्चा आहे.
श्रीरंग बारणे यांच्याविरोधात आता भाजप आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर होण्याआधीच महायुतीच्या इतर पक्षांचा विरोध होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरंग बारणे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मात्र मतदारसंघात भाजप एकवटली आहे.
‘आम्ही २ वेळा बारणेंसाठी झटलो, पण आता आम्हाला बारणे उमेदवार नकोत. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंनाच उमेदवारी द्या’, अशी मागणी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बैठकीत केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी देखील बारणेंच्या उमेदवारीला सुरवातीपासूनच विरोध केला आहे. त्यातच भाजप देखील बारणेंच्या विरोधात एकवटली आहे. बाळा भेगडे यांच्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
येत्या काही दिवसांत बारणेंच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. पण यापूर्वीच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी बारणेंच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी वारंवार बैठका सुरु आहेत. आणि आता बारणेंच्या उमेदवारीला महायुतीतील दोन्हीही पक्षांकडून विरोध होताना पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्यांनी डोक शांत ठेऊन निर्णय घ्यावा’; वसंत मोरेंनी घेतली धंगेकरांची भेट
-मोठी बातमी: पुणे लोकसभेसाठी तिसऱ्या टप्यात १३ मे ला मतदान तर चार जूनला मतमोजणी
-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान
-मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?
-सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’