पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकीच एक मतदारसंघ म्हणजे शिरुर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघाचे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आहेत. महाविकास आघाडीकडून शिरुरमध्ये अमोल कोल्हे यांनाच पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.
अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरुरमधून निवडणूक लढवणार असल्याचं बोलत होते. मात्र त्यांना म्हाडाचे अध्यक्षपद दिल्यानंतर आता महायुतीतील भाजपने देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अशी चर्चा रंगत असताना आता भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपकडून शिरुरची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे.
चाकण येथील भाजपच्या बुथ कमिटी संमेलनाच्या सभेत महेश लांडगे शिरुर निवडणुकीबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघावर अजित पवार गटाने दावा केलेला आहे. असं असतानाच आता शिरुरमधून भाजपचा उमेदवार असावा, अशी अपेक्षा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली आहे.
“राज्यातल्या ४८ लोकसभेत शिरुर हा ३६ नंबरचा मतदारसंघ आहे आणि हा आकडा माझ्यासाठी लकी आहे. ३६ नंबरच्या शिरुर लोकसभा मतदारांची बेरीज ९ तर माझी जन्मतारीखीची बेरीज ९ असा माझ्यासाठी लकी आहे”, असं म्हणत महेश लांडगे यांनी शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप
-“मी राजकारणात असतो तर…”; व्हायरल पत्रानंतर राजेंद्र पवारांची प्रतिक्रिया
-निलेश राणेंना पुणे महापालिकेचा दणका, करोडोंची प्रॉपर्टी केली सील; मोठं कारण आलं पुढे