पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. मतदारसंघ निहाय आढावा घेत उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. अशातच पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या मतदारसंघापैकी एक असणाऱ्या खडकवासला मतदारसंघामध्ये आज भाजपची बैठक पार पडली. यामध्ये आमदार भीमराव तापकीर त्याचबरोबर इच्छुक नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले आहे.
भाषणामधील मुद्द्यांवरुन इच्छुक उमेदवार आणि आमदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे देखील पहायला मिळाले आहे. ‘आमदार भीमराव तापकीर यांनी कोणालाच न बोलून दिले नाही’, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचे मतदान घेण्यात आले. त्यामध्ये उमेदवार कोण असावा याबाबत गुप्त मतदान करुन हे लिफाफे प्रदेश कार्यालयामध्ये उघडले जाणार आहेत.
भाजपचे पक्ष निरीक्षकक मुन्ना महाडिक यांच्यासमोर आमदार भीमराव तापकीर यांची इच्छुक उमेदवारांवर तुफान खडाजंगी झाल्याचे पहायला मिळाले आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खडकवासला मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीवरून दोन गट पडले असून भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या विरोधात पक्षांतर्गतच नाराजी दिसून येत आहे. याचे विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं
-सुनील तटकरेंना मुंबईहून रायगडला नेणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचा मृत्यू
-कसब्यात ‘पोस्टरवॉर’! रासने समर्थक लागले कामाला; ‘तैयार है हम’चा दिला नारा
-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा