पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात रविवारी पहाटे शहरातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत आपल्या आलिशान पोर्श कारने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली. या अपघातामध्ये तरुण तरुणीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावरून पुण्यातील नाईट लाईफ हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
पुणे या शहराला विद्येचे माहेरघर अशी जगप्रसिद्धी आहे. आणि याच पुणे शहरामध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मद्यसेवन केलेली अनेक तरुण-तरुणी मध्यरात्रीच्या सुमारास आपली वाहने सुसाट वेगाने चालवत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपणाला सामोरे जावे लागत आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. असे म्हणत भाजपचे चिटणीस लहु बालवडकर यांनी यासंदर्भात उपाययोजना करण्यात याव्यात, याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पत्र पाठवले आहे.
‘मद्यधुंद चालकांच्यामुळे औंध, बाणेर,बालेवाडी या परिसरात देखील अनेक पब, बिअरबार असून या भागात देखील नागरिकांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आपल्या भागात म्हणजेच बाणेर बालेवाडी औंध येथे सुरु असलेली नाईट लाईफ संस्कृती थोपविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब, बार व हॅाटेल चालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच मध्यरात्री शहरातील अनेक चौकाचौकात तरुण तरुणी गर्दी करुन हुल्लडबाजी करत असतात. त्यावर चाप बसविण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे गरजेचे आहे’, अशी मागणी देखील लहू बालवडकर यांनी केली आहे.
तसेच औंध बाणेर बालेवाडी या परिसरातील पब हे रात्री ८ वाजेनंतर सुरु होतात आणि पहाटेपर्यत सुरूअसतात. त्यानंतर अनेक तरुण-तरुणी पार्टीच्या नावाखाली नशेत हुल्लडबाजी करतात. त्यामुळे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पब,बार व हॅाटेल चालकांना वेळेचे बंधन घालावे. तसेच रात्री बेदारकारपणे गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, आपल्या भागात सुरु असलेल्या नाईट लाईफमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा देखील मुद्दा आहे. नाईट लाईफमुळे तरुण तरुणी नशेच्या अमलाखाली गेल्याने, त्यांना कसलेही भान राहत नाही. त्यामुळे अनेकवेळा तरुण-तरुणी रस्त्यावरच अश्लील चाळे करताना, नाचताना, धिंगाणा घालताना व वेड्यावाकड्या गाड्या चालवताना दिसतात, याकडे देखील गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. सोबतच कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी असणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई करून मृतांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशीही विनंती देखील लहू बालवडकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पिंपरी चिंचवड महापालिका अॅक्शन मोडमध्ये; शहरातील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई सुरू
-चहाप्रेमींनो, जास्त वेळ उकळलेला चहा पिणं ठरु शकतं घातक; होऊ शकतात गंभीर परिणाम
-‘लोक तुम्हाला का नाकारतात? कारण, तुमचा…; पुणे अपघातावरुन मोहोळ-धंगेकरांच्यात तू-तू मै-मै!
-Pune Hit & Run: विशाल अग्रवालला बेल की जेल? वाचा कोर्टात आज नेमकं काय घडलं?
-Pune Hit And Run | वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकचा प्रयत्न