पुणे : विधानसभा निवडणुकीमध्ये मावळच्या जागेसाठी महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या माजी राज्यमंत्री भाजपचे नेते बाळा भेगडे यांनी मावळच्या जागेवर दावा केला. याच मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके हे आमदार आहेत. बाळा भेगडे यांच्या दाव्यानंतर सुनील शेळके यांच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे.
ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षासाठी ती जागा सोडायची असा महायुतीचा सरळ फॉर्म्युला असूनही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असताना भाजपने मावळच्या जागेवर दावा केला. या दाव्यावर आता सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल’, अशी भूमिका सध्या तरी सुनील शेळके यांनी घेतली आहे.
‘लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या उमेदवाराच शंभर टक्के प्रामाणिक काम केले. परंतु, त्याच्यावर कोणी शंका घेत असेल आणि आम्हाला जागा मिळावी म्हणून आग्रह करत असेल तर योग्य नाही. शेवटी महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल’, असे सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-महिलांच्या तक्रारी मागे राजकीय वास? आमदार शिरोळेंना शंका, म्हणाले ‘त्या’ लोकांचा हेतू…
-Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?
-लाडकी बहिण योजनेच्या जाहिरातीत संमतीशिवाय फोटो वापरला; महिलेची पुण्यातील भाजप आमदाराविरोधात तक्रार