पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. पाटील यांच्या सोबतीला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी त्यांचे देखील साथ मिळताना दिसत आहे. भाजप प्रभाग क्रमांक १० मध्ये पाटील यांच्या प्रचारार्थ बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच ध्यास असून, गेल्या पाच वर्षांपासून कोथरुड हे कुटुंब मानून कार्यरत आहे असून भविष्यातही कोथरुडसाठी समर्पित होऊन काम करणार असल्याची भावना यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी भाजप दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आशिष शिंदे, रिपाइंचे ॲड. मंदार जोशी, नगरसेवक दिलीप वेडे पाटील, नगरसेविका अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभूणे-पाठक, बाळासाहेब टेमकर, वैभव मुरकुटे, गणेश वर्पे, कैलास मोहोळ, बाळासाहेब खंकाळ, राजेश गायकवाड, सिताराम खाडे यांच्या सह महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महत्वाच्या बातम्या-
-सत्ताधारी आमदारांना कळेना नियम, मनमर्जी कारभार; अखेर गुन्हा दाखल
-“राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका”; अजितदादांचा कार्यकर्त्यांना सल्ला
-“जनतेने दाखवलेला हा विश्वास मी निश्चितच माझ्या कार्यातून सार्थ ठरवीन”- हेमंत रासने
-अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर हर्षवर्धन पाटलांचं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले, ‘निकालातून..’
-लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी: १५०० नाही तर आता मिळणार २१०० रुपये