पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्षात शिरुरच्या लोकसभा मतदारसंघात आमनेसामने लढत होणार आहे. त्यातच आता यात भाजपनेही उडी घेतली आहे. शिरुर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते.
शिरूरमध्ये भाजप विचारसरणीचाच खासदार होईल, असं वक्तव्य भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी खेड येथे भाजप कोअर कमिटीची बैठक झाली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेकडून उमेदवार जाहीर झाला तरी भाजपची भूमिका शिरूरमध्ये विजयासाठी आता महत्त्वाची ठरणार आहे.
शिवसेना फुटीनंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर सध्याचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटात राहणे पसंत करून अजित पवार यांच्यावर थेट टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना शिरूरमध्ये आमचा खासदार होता. त्यामुळे ही जागा आम्हालाच मिळायला हवी अशी उपमुख्यमंत्री अजित पवार गटाची मागणी आहे.
महायुतीच्या तिकीट वाटपात तसे होण्याची शक्यता आहे. मात्र, शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही “मी निवडणूक लढविणार आणि जिंकणारच” असा चंग बांधला आहे. आढळराव पाटील यांना रिंगणातून बाजूला करण्यासाठी पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्षपदही नुकतेच देण्यात आले आहे. परंतु, शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये एकमत होण्याची चिन्हे दिसत नसल्याने भाजपने शिरूरच्या रिंगणात उडी घेतल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्याच्या विकासासाठी शिवाजीराव मानकरांचे ‘हे’ व्हीजन; सांगितली विकासाची चतु:सूत्री
-महाविकास आघाडीत बिघाडी??? मावळ मतदारसंघात वंचितने केला दावा
-रविंद्र धंगेकर पुणे लोकसभा निवडणूक लढणार?; पक्षाकडे केली उमेदवारीची मागणी
-पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ सहा मेट्रो स्टेशनची नावे बदलणार
-“पवार कुटुंब आजही एकत्रच, निनावी पत्राबाबत माहिती नाही”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिय