पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यातच पुण्यात भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असलं तरीही भाजपकडून राज्यातील लोकसभा मतदार संघासाठीच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या संभाव्या यादीत भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजप नेत्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. त्यानंतर जगदीश मुळीक यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र या भाजपच्या सरप्राइज यादीत थेट मुरलीधर मोहोळ यांचे नाव दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहरात दांडगा जनसंपर्क असल्याने पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही चांगलेच सक्रिय सहभागी होते. येत्या निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी दौरे आणि कार्यक्रमांना हजेरी लावाण्यस सुरुवात केली आहे.
पुण्यातील महत्वाच्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावतात त्यावेळी कायम मुरलीधर मोहोळांच्या कार्याचं कौतुक करताना दिसतात. भाजपच्या संभाव्या यादीत नाव आल्याने मोहोळ लोकसभेच्या तयारीला लवकरच सुरुवात करतील. मात्र भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त
-‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले
-‘गद्दारांचा पराभव करुन मीच सेनेचा खासदार’; मावळमध्ये ठाकरे गटाच्या वाघेरेंची प्रचाराला सुरवात
-कसब्यात “होय हे आम्ही केलं”चा पॅटर्न; निवडणूक लोकसभेची पण कसब्यात चर्चा ‘पोस्टर वॉर’ची